Indian Army Aviation Wing’s daring helicopter rescue mission in Pathankot floods seconds before building collapse. Saam Tv
Video

पठाणकोटमध्ये २५ जवानांना कसं वाचवलं; अंगावर शहारे आणणारं रेस्क्यू ऑपरेशन | VIDEO

Indian Army Helicopter Rescue Operation In Pathankot: पठाणकोटमध्ये पूराच्या पाण्यात अडकलेल्या २५ जवानांना भारतीय लष्कराच्या एव्हिएशन विंगने थरारक रेस्क्यू ऑपरेशन करून वाचवले. इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वी जवानांची सुटका करण्यात आली.

Omkar Sonawane

पठाणकोट: भारतीय लष्कराच्या एव्हिएशन विंगने पंजाबमध्ये एक थरारक बचाव मोहिम राबवली असून त्याचा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल. भारतीयसेनेने पंजाबमधील माधोपुर हेडवर्क्स येथे पूराच्या पाण्यात अडकलेल्या आणि धोकादायक असलेल्या इमारतीतून नागरिक आणि सीआरपीएफच्या जवानांना सुरक्षित बाहेर काढले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक उड्डाण परिस्थिती असूनही भारतीय लष्कराने पठाणकोटमध्ये हा हाय-रिस्क रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केला. पाण्याने वेढलेल्या एका इमारतीत अडकलेले नागरिक आणि तब्बल २५ सीआरपीएफ जवानांना वाचवण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे या जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर काही सेकंदांतच ती इमारत कोसळली.

शहारे आणणारा व्हिडीओ

भारतीय सैन्याने आपल्या एक्स (Twitter) आणि इंस्टाग्राम हँडलवर या थरारक बचाव मोहिमेचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच इमारत कोसळतानाचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. या मोहिमेसाठी ‘उच्चस्तरीय उड्डाण कौशल्य आणि अप्रतिम शौर्य’ आवश्यक होते, असे अधिकारी सांगतात. बुधवारी सकाळीच एव्हिएशन विंगचे हेलिकॉप्टर या मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये सैनिकांच्या धैर्य, कौशल्य आणि दृढनिश्चयाची खरी परीक्षा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT