Ind vs Pak T20 World Cup 2026 Colombo Sri Lanka saam tv
Video

IND vs PAK : हाय व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक सामन्यात पावसाचे सावट; दोन्ही संघांचे टेन्शन वाढले!

India vs Pakistan, T20 World Cup match : टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट. कोलंबोमध्ये ७०-८०% पावसाचा अंदाज असल्याने गुणतालिकेचे गणित बदलण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

India vs Pakistan T20 World Cup rain forecast Colombo : टी-२० विश्वचषकात आज क्रिकेट चाहत्यांना ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामना रंगणार आहे. क्रिकेटच्या मैदानातील या महायुद्धासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. श्रीलंकेत संध्याकाळी ७ वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोलंबोमध्ये ७० ते ८० टक्के पाऊस पडू शकतो. सामना रद्द झाला तर याचा परिणाम गुणतालिकेवर होऊ शकतो.

सध्याच्या गुणतालिकेचा विचार करता, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडे प्रत्येकी ४ पॉईंट्स आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आपले स्थान मजबूत करण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या विजयाची आणि २ पॉईंट्सची अत्यंत गरज आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. यामुळे दोन्ही संघांचे रणनीती आखण्याबाबतचे टेन्शन वाढले आहे. जर पाऊस आला, तर पॉईंट्सचे गणित कसे असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT