Pakistani Youtuber Saam TV
Video

Pakistan : पाकिस्तानी युट्यूबरची बंदी भारतात उठवली ? | VIDEO

Pakistani Youtuber : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकार, अभिनेते, क्रिकेटपटू यांची समाजमाध्यमावरील खाती भारतात बंद केली होती. मात्र आता ही बंदी हटवण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानातील कलाकार, अभिनेते, क्रिकेटपटू यांच्या सोशल मीडिया खात्यांवर भारतात बंदी घातली होती. त्यामुळे अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतीय युजर्सना दिसत नव्हते.मात्र आता ही बंदी हटवण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. कारण अनेक युजर्सना पुन्हा एकदा पाकिस्तानी सेलिब्रिटींची खाती सहजपणे उघडता येत आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर या बंदीच्या उठवण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारने अद्याप या बंदीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही तांत्रिक चूक आहे की जाणूनबुजून बंदी हटवण्यात आली आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.काही तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लावलेली बंदी काही वेळेस कालमर्यादित असते. बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती आपोआप हटते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.सध्या याबाबत अधिकृत स्पष्टीकरणासाठी सगळ्यांचे लक्ष सरकारकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या राशीभविष्य

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?

Harshal Patil: हर्षल पाटीलच्या आत्महत्येला सरकार जबाबदार? पाणीपुरवठा मंत्र्यांनी झटकले हात?

Bhandara News: हवामान विभागाकडून भंडाऱ्याला रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी

SCROLL FOR NEXT