india pakistan tension saam tv
Video

Operation Sindoor: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री तोंडावर आपटले, अजब उत्तरानं अख्खी संसद गदगद हसली|VIDEO

No Drones Shot Down: पाकिस्तानने भारतातील 15 ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताने तेथील काही ठिकाणी हारोप या ड्रोनच्या सहाय्याने अत्यंत भेदक हल्ले केले.

Omkar Sonawane

पाकिस्तानने भारतातील 15 ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तेथील लाहोर, अटक, गुजरानवाला, चकवाल रावळपिंडी, बहावलपूर, मियांवली, छोर, कराची या नऊ ठिकाणी हारोप या ड्रोनच्या सहाय्याने अत्यंत भेदक हल्ले काल केले. मात्र यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी संसदेत आकलेचे तारे तोडले आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफने पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्व खासदार पोट धरून हसायला लागले. ख्वाजा असिफने पाकिस्तानी सैन्याने भारतीय ड्रोन पाडल्याचा'दावा फेटाळला. हा दावा फेटाळत असताना मात्र त्याने स्वतःचेच हसू करून घेतले आहे. तो म्हणाला, पाकिस्तानच्या एअर डिफेन्सची ठिकाण समजू नयेत त्यामुळे भारताचीड्रोन पाडली गेली नाहीत असा हास्यास्पद दावा ख्वाजा असिफने केला.

आमच्या एअर डिफेन्स युनिटसची जागा शोधण्यासाठी हा ड्रोन हल्ला करण्यात आला होता. काही तांत्रिक माहिती मी सांगू शकत नाही. आपल्या हवाई संरक्षण युनिटसची जागा माहित पडू नये म्हणून आम्ही ड्रोन थांबवले नाही असं ख्वाजा असिफ बरळला. त्यानंतर सर्व संसदेत एकच हशा पिकला. पाकिस्तानची अवस्था सध्या 'गिरे तो भी' टांग उपर अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT