China Intrusion Claim In Arunachal Pradesh | Taksing Border Tension AI Image
Video

India China Border : भारतीय सीमेत चीनची पुन्हा घुसघोरी? PPA च्या फॅक्ट फाइंडिंग टीमचा रिपोर्ट

India China Border News : अरुणाचल प्रदेशातील टाकसिंग भागात चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी झाल्याचा PPAचा दावा. भारतीय सैन्याच्या पेट्रोलिंगला अडथळा आणल्याच्या आरोपामुळे भारत-चीन सीमेवरील तणाव पुन्हा चर्चेत.

Alisha Khedekar

भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशातील टाकसिंग भागात चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (PPA)च्या फॅक्ट-फाइंडिंग अहवालात या गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. अहवालानुसार, टाकसिंग परिसरात भारतीय सैन्याला त्यांच्या नियमित पेट्रोलिंग पॉईंटपर्यंत जाण्यापासून चिनी बाजूने रोखण्यात आल्याचा दावा आहे. त्यामुळे या दुर्गम सीमावर्ती भागातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे भारत-चीन सीमेवरील तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, सीमावर्ती भागात चीनच्या हालचालींबाबत यापूर्वीही अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या अहवालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारवर आक्रमक टीका केली आहे. देशाच्या सीमांची सुरक्षा आणि भारतीय जवानांना पेट्रोलिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत आहे का, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, PPAच्या या दाव्यांची केंद्र सरकारकडून अधिकृत पुष्टी किंवा सविस्तर स्पष्टीकरण समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

पंचामृत प्यायल्याने शरीराला काय फायदा होतो? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: सोलापुरात माजी नगरसेवकावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक

Janmashtami 2026 Marathi Wishes: प्रेम असो वा मैत्री... जन्माष्टमीचे 'हे' शुभेच्छा संदेश जिंकतील प्रत्येकाचे मन, 5 व्या क्रमांकाचा सर्वात बेस्ट

National Tree Of India : भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ९९ टक्के लोकांना माहितीच नाही

SCROLL FOR NEXT