India Alliance meeting  saam tv
Video

India bloc meeting : केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी, इंडिया आघाडीच्या नेत्यांचा ठरतोय प्लान

INDIA bloc meeting on September 30 over SIR and Election Commission : केंद्रातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

Nandkumar Joshi

नवी दिल्लीत ३० सप्टेंबरला इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्यांच्या विरोधात महाभियोग कसा आणायचा, तसंच दिल्लीत आंदोलन करण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत एसआयआर, निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांशी संबंधित विषयांवर चर्चा होणार असल्याचं कळतं. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष यासंबंधी एकमेकांच्या संपर्कात आहेत. २९ सप्टेंबरला काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्यात एसआयआरच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष रणनीती आखणार असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT