Stock Market saam tv
Video

Stock Market: भारत-पाकिस्तान संघर्षाचा शेअर बाजाराला फटका, गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले

Share Market Crash: भारत-पाकिस्तान तणावाचा गुंतवणूकदारांच्या मनोवृत्तीवर परिणाम झाला आहे. शुक्रवारी शेअर बाजारात मोठा दबाव दिसून आला आणि उघडताच सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या दिशेने घसरले.

Dhanshri Shintre

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आता थेट शेअर बाजारावरही परिणाम करताना दिसत आहे. ८ मे रोजी बाजार घसरणीसह बंद झाला. त्यानंतर पाकिस्तानकडून काही भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली, ज्याला भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या प्रत्युत्तर दिले. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण पसरलं असून बाजाराच्या स्थिरतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शुक्रवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याचा सामना करावा लागला. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि निर्देशांक १ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. निफ्टीतील कोणताही क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हात नव्हता. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सही घसरले. यामुळे बीएसईवरील एकूण बाजार भांडवलीकरणात ८.३० लाख कोटी रुपयांची घट झाली आणि गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षामुळे रुपया घसरला आहे. शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. सेनसेक्स ६०० तर निफ्टी १५० अंकांनी घसरला आहे. भारत आणि पाकिस्तानवरील सीमेवर जो प्रचंड तणाव आहे त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झालेला आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी बाजार उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यासोबतच रुपया देखील डॉलरच्या तुलनेत १० पैशांनी कमकुवत झालेला दिसत आहे. गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटींचे नुकसान झालेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT