अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्यात येणार आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांचं मानधन आता 5 हजार रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. तर मदतनीसांचे पगार देखील 3 हजार रुपयांची वाढ केली गेली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मानधन वाढीसाठी आंदोलन करत होत्या. उपोषण, सरकार विरोधी आंदोलन अनेक मार्गांनी ही मागणी अंगणवाडी सेविकांनी लावून धरली होती. त्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. यात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 50 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. जी 5 हजार रुपये इतकी असणार आहे. मदतनीसांच्या पगारातसुद्धा 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी या बैठकीतून राज्य सरकारने निर्णयांचा पाऊस पडला असून सगळ्या घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.