Imtiaz Jaleel saam tv
Video

Imtiaz Jaleel: जिथे खड्डे खोदले तिथेच पुरणार; इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमकी|VIDEO

Will Bury You Where the Pits Are Dug: पक्षाचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला तुला पुरून टाकेल अशी दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील आमखास मैदानावर वक्फ बोर्डाकडून बांधकाम होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट आमखास मैदान गाठले. हमखास मैदान हे क्रिकेट फुटबॉलसह वेगवेगळ्या खेळांसाठीची मैदान आहे त्या ठिकाणी बांधकाम कसे काय सुरू करता असा प्रश्न उपस्थित करत त्या ठिकाणचे बांधकाम रोखले.

त्यानंतर इम्तियाज जलील हे एमआयएमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट वक्फ बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले. खेळासाठीचे मैदान आहे तिथे बांधकाम करीत आहेत, हे कोणाला विचारून केले असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. जमीन वक्फ बोर्डाची आहे आणि तिथं बांधकाम विभागाच्या वतीने बांधकाम कसं सुरू आहे त्याला एनओसी कोणी दिली? असे सवाल करत जलील अधिकाऱ्याला म्हणाले, तुला मैदानावर घेऊन जातो आणि जिथे खड्डे खोदले तिथेच तुला पुरून टाकेल अशी खुलेआम धमकी जलील यांनी अधिकाऱ्याला दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT