Eknath Shinde News Saam Tv
Video

Maharashtra Politics : शिंदे गटाची रणनिती तयार?

Eknath Shinde : मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर शिंदे गटाची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना तात्काळ रत्निगीरीवरून मुंबईला बैठक घेण्यासाठी बोलवल आहे.

Saam Tv

शिंदे गटाची निवडणूक नियोजन रणनिती ठरवण्यासाठी मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर एक अत्यंत महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. शिंदे गटाची रणनिती बैठकीला जेष्ठ मंत्री उदय सामंत उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना तात्काळ रत्निगीरीवरून मुंबईला बैठक घेण्यासाठी बोलवल आहे. शिंदे आणि सामंत यांच्यातील चर्चेचा अहवाल एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे.

त्यामुळे या बैठकीमुळे शिंदे गट देखील अॅक्शन मोडवर आलेला बघायला मिळत आहे. विधानसभेसाठी आपली ताकद किती आहे यासाठी शिवसनेने देखील सर्व्हे केला आहे. त्यावरून अनुकूल जागांची एक यादी देखील बनवण्यात आली आहे. याच यादी सांदर्भात दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यानंत हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या जागावाटपा संदर्भात महत्वाची चर्चा होत आहे. जेष्ठ मंत्री उदय सामंत आणि दादा भूसे यांच्यात शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा संपल्यावर या चर्चेतील रिपोर्ट मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या जागावाटपाचा अंतीम निर्णय घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Song Controvery: नोरा फतेहीला मोठी झटका! 'सरके चुनर' गाण्यावर बंदी, यूट्यूबवरूनही गाणं हटवलं

Jio Recharge: SIM चालू ठेवण्यासाठी Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, किंमत फक्त...

Shocking : धक्कादायक! नवीन मोबाइल फोन घेऊन दिला नाही, पुण्यात महिलेची आत्महत्या

Eknath Shinde On Uddhav Thackeray: आमदारकीसाठी ठाकरेंना मदत करणार का? एकनाथ शिंदे हसले अन् एका वाक्यात विषय संपवला

Maharashtra Live News Update: भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या बंदरात दाखल

SCROLL FOR NEXT