Rain Update Saam TV
Video

Maharashtra Rain Update : मुंबई, ठाणे, कोकणात रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा|VIDEO

Rain News : मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकण परिसरात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार असून, मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागासह स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होऊ शकतो. काही महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठल्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आला आहे ते जाणून घेवूया -

मंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापुर, सातारा या जिल्हांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक, नागपुर, बुलढाणा, वाशिम, भंडारा आणि संपूर्ण विदर्भ या जिल्हांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

माथेफिरूचा थरार, भीषण गोळीबारात ८ लहान मुलांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सुटणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT