heavy rain expected in mumbai Thane next 7 hours saam tv
Video

मुंबई, ठाण्यासाठी पुढील ७ तास अत्यंत महत्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता | VIDEO

Mumbai Thane Heavy Rain Alert : मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे.

Nandkumar Joshi

मुंबईसाठी पुढील सात तास हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, पुण्यासह कोकणकिनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेली चार दिवस मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, रायगड आणि पालघरला मुसळधार पावसानं झोडपलं होतं. मुंबई उपनगरीय रेल्वेसेवा काही तास बंद झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळं मुंबई काही तास 'थांबली' होती. रस्तेवाहतूक मंदावली होती. तर रेल्वे ठप्प झाली होती. आसपासच्या जिल्ह्यांतून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.

मुंबईत रात्री पाऊस काही वेळ बरसला. सकाळीही रिपरिप सुरू होती. पण दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतली. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील सात तास महत्वाचे आहेत. मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांत पुन्हा पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT