Buldhana News SaamTv
Video

Buldhana Breaking : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती? अवैध धंदे बंद केले म्हणून सरपंच पतीवर हल्ला

Sarpanch Husband Attacked by Criminals : कळंबेश्वरच्या सरपंच पतीवर हल्ला करण्यात आला आहे. जानेफळ पोलिसात या प्रकरणी पाच हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Saam Tv

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर या गावात अवैध धंदे बंद केल्याने चवताळलेल्या गावगुंडांनी सरपंच पतीवर प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला एका अंत्यसंस्काराच्या ठिकाणी करण्यात आला.

कळंबेश्वर येथील सुभाष खुरद यांच्या पत्नी डिसेंबर 2023 पासून ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि त्या सरपंच पदावर आल्यापासून त्यांनी गावात विविध विकास कामे सुरू केलीत. कामे सुरू करत असताना त्यांनी गावातील अवैध धंदेही बंद केले. त्यामुळे गावातीलच अवैध धंदे असलेल्या गुंडांनी त्यांच्या पतीला म्हणजेच सुभाष खुरद यांना अनेकदा धमक्याही दिल्या. काल गावातील एका वृद्ध महिलेच्या अंतिम संस्काराच्या आटोपून घरी परत जात असताना गावातील पाच गुंडांनी सुभाष खुरद यांच्यावर प्राण घातक हल्ला चढवत..." आमचे अवैध धंदे पुन्हा सुरू न करू दिल्यास आम्ही तुझा मस्साजोगचा सरपंच करू...!" अशी धमकी देऊन निघून गेले. या हल्ल्यात सुभाष खुरद हे जखमी झाले असून त्यांच्या जवळील काही दागिने हल्लेखोरांनी लंपास केले. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा जमा होणार अडकलेले पैसे? व्हायरल मेसेजचं सत्य आले समोर

Maharashtra News Live Update: मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवाजी पार्कवर एल्गार; CJP चे पोलिसांना थेट पत्र

Nitin Gadkari : पेट्रोलचे टेन्शन विसरा! आता २५ रुपये लिटरमध्ये धावणार कार; गडकरींचा दावा पाहून बसेल धक्का

दुष्काळाच्या संकटात बळीराजासाठी देवस्थान धावून आलं; थेट १ कोटी ११ लाखांची मदत

Rice vs Chapati : भात की चपाती, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT