samruddhi mahamarg saam tv
Video

Samruddhi Mahamarg: इगतपुरी ते ठाणे अवघ्या १० मिनिटात! समृद्धी महामार्गाचा मोठा टप्पा पूर्ण -VIDEO

Samruddhi Mahamarg, Igatpuri To Thane: समृद्धी महामार्गाचा नागपूर ते नाशिक पर्यंतचा मोठा भाग तयार झालेला आहे. दरम्यान १० मिनिटात इगतपुरी ते ठाणे प्रवास करता येणार आहे.

Ankush Dhavre

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते नाशिक पर्यंतचा मोठा भाग तयार झालेला आहे. मात्र तुलनेने सर्वात कठीण असलेला आणि निर्माणासाठी आव्हानात्मक असलेला नाशिक ते ठाणे पर्यंतचा पॅकेज 14 चा टप्पा आता पूर्ण झाला आहे. याचदरम्यान इगतपुरीपासून सुरू होणारा कसारा घाट आहे, ज्यामध्ये प्रत्येकी 8 किमीचे 2 बोगदे सह्याद्री पर्वतरांगेच्या खालून तयार करण्यात आले आहेत. हे महाराष्ट्रातले सर्वाधिक लांबीचे बोगदे आहेत. समृद्धीच्या या टप्प्याचा हा भाग साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी.

समृध्दी महामार्गाचे पॅकेज 14 एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बांधकाम करण्यात देण्यात आले होते. हे काम या कंपनीने वेळेच्या आधीच 3 महिने पूर्ण करून दिले आहे. नाशिकच्या पिंपरी सद्द्रोदिन पासून ते ठाण्याच्या वशाला बुदुक पर्यंत आहे. पण यातच येते ती सह्याद्रीची पर्वतरांग. हे पॅकेज केवळ 13.1 किमीचे होते मात्र सर्वात अवघड आणि सर्वात कठीण असे हेच काम होते. ज्यात 2 कीमीचे पूल, प्रत्येकी 8 कीमिचे बोगदे, इंटर चेंज, यांचा समावेश आहे. तसेच भारतातले आतापर्यंतचे सर्वाधिक रुंदीचे आणि महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वाधिक लांबीचे बोगदे - भारतातील सर्वात जास्त रुंदीचे बोगदे हे समृध्दी महामार्गावर बांधण्यात आलेत. त्यांची रुंदी 17.6 मीटर इतकी प्रचंड आहे,

तर लांबी 8 किमी पर्यंत आहे. असे 3 लेनचे 2 वेगवेगळे बोगदे बांधण्यात आलेत. यामध्ये अत्याधुनिक स्काडा तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. ज्यामुळे हे बोगदे इंटिग्रेटेड टनेल बनले आहेत. यात कधीच लाईट जाणार नाही, अपघात झाला, आग लागली तरी ताबडतोप कंट्रोल करता येईल, वेंटीलेशन सेन्सॉर, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम बसवण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय मोठी आपत्ती आल्यास थेट बोगद्यातून बाजूच्या गावात जाण्यासाठी वेगळे भुयार करण्यात आले आहे.. आणि येत्या संप्टेंबर पासून हे बोगदे नागरिकांसाठी खुले होणार असुन, प्रवाश्यांचा मोठा वेळ वाचून प्रवास हा समृद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT