SC to Election Commission Saam TV News
Video

Supreme Court On Election Commission : नोटाला सर्वाधिक मतं मिळाल्यास पुन्हा निवडणूक होणार?

SC to Election Commission: सूरतमध्ये निवडणूक बिनविरोध होण्याची परिस्थिती टाळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.

Saam TV News

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला एक नोटिस बजावली आहे. सूरत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला एक विचारणा केली आहे. उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मतं मिळाली, तर त्याठिकाणी नव्यानं मतदान घ्यावं का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केली आहे. सूरतमध्ये निवडणूक बिनविरोध होण्याची परिस्थिती टाळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं आता निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे. तशी नोटीसही आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तरादाखल निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका मांडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणताही उमेदवार योग्य न वाटल्यास मतदारांना नोटाला मत देण्याचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल, तर अशावेळी निवडणूक बिनविरोध होऊन एका उमेदवाराला बिनविरोधी विजयी करण्याच्या प्रक्रियेवर आता नव्याने विचार केला जातो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दोन दिवसात १० मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतातील कांदा गेला वाहून

Google Gemini Photos: रेट्रो लूक करायचाय? पण जमतच नाही; हे 10 Prompt वापरा अन् ट्रेडिंगमध्ये राहा

Kumbha Rashi: पैशांचे संकट दूर होणार का? जाणून घ्या कुंभ राशीचे सोमवारचे भविष्य

Dashavatar Collection: दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' हाऊसफुल, रविवारी सर्व रेकॉर्ड मोडले

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

SCROLL FOR NEXT