Ichalkaranji Municipal Corporation Saamtv
Video

Chicken Mutton Shop: स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय मागे|Video

Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजी महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदी मागे घेतली आहे. यामुळे १५ ऑगस्ट रोजी चिकन आणि मटणाची दुकाने खुली ठेवता येणार आहे.

Bharat Jadhav

  • इचलकरंजी महापालिकेने 15 ऑगस्ट रोजीची मांस विक्री बंदी मागे घेतली.

  • खाटीक समाज आणि मांस विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला होता.

  • जनभावना लक्षात घेऊन निर्णय मागे घेण्यात आला.

  • चिकन आणि मटण दुकाने 15 ऑगस्ट रोजी सुरू राहणार.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यातील अनेक महापालिकांनी मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. राज्यातील कल्याण-डोंबिवली, मालेगाव, अमरावती, नाशिक, नागपूर,जळगाव, इचलकरंजी अशा सात महापालिकेच्या आयुक्तांनी आदेश काढत मांस विक्रीचे आदेश जारी केले होते. परंतु यविरोधी पक्षांकडून या निर्णयाचा जोरदार विरोध झाला. खाटीक समाज आणि मांस विक्री करणाऱ्यांनी महापालिकांच्या या निर्णयाला विरोध दर्शवलाय.

आता या विरोधानंतर इचलकरंजी महानगरपालिकेने मांस विक्री बंदीचा आदेश आता मागे घेतलाय. १५ ऑगस्ट रोजी चिकन मटण विक्री सुरू राहणार असल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय. महापालिकेनं जनभावना लक्षात घेत हा निर्णय घेतलाय. किमान १५ ऑगस्टच्या रोजी चिकन आणि मटण शॉप चालू ठेवण्यात यावी अशी मागणी काही लोकांनी महापालिकेत केली होती. तर बंदीचा आदेश आल्यापासून जनमाणसात त्याचा विरोध सुरू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT