Tadgola : परप्रांतीय विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, ताडगोळे गटारात धुतले, VIDEO saam tv
Video

Khed News : परप्रांतीय विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, ताडगोळे गटारात धुतले, VIDEO

Khed News Update : ताळगोळे अगदी आवडीनं आणि चवीनं खाताय, तर मग हा व्हिडिओ एकदा बघाच. विक्रेत्यानं ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्यात धुतले.

Nandkumar Joshi

अमोल कलये, रत्नागिरी, साम टीव्ही

मेथीची भाजी असो की इतर कोणती पालेभाजी. या पालेभाज्या किंवा फळे कुठे धुतली जातात हे आपण कधी बघितलंय का? याआधी पालेभाज्या गटाराच्या पाण्यात धुतल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका परप्रांतीय विक्रेत्यानं विक्रीसाठी ठेवलेले ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्यात धुतले. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

खेडमधील ही घटना आहे. येथील तहसील कार्यालयासमोर हा परप्रांतीय विक्रेता ताडगोळे विकत होता. त्यानं विक्रीसाठी ठेवलेले ताडगोळे गटाराच्या पाण्यात धुतले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या परप्रांतीय विक्रेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अल्लाउद्दीन खुदुस शेख असं या विक्रेत्याचं नाव आहे. भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ कलम २७१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

Banarasi Saree Tips : बनारसी आणि सिल्क साडी घरच्या घरी ड्राय क्लीन कसं कराल? जाणून घ्या 7 सोप्या टिप्स

Rava Kesari Recipe: गुढीपाडव्याला पाहुणे येणार असतील तर नक्की बनवा रवा केसरी, आत्ताच नोट करा पांरपारिक रेसिपी

वार्षिक गुन्ह्याच्या तपासणीला सेलिब्रिटी सारखा तामझाम, पुणे पोलिस आयुक्तांच्या स्वागताला "रेड कार्पेट"

Sanju Samson: संजूला लागली लॉटरी! संजू सॅमसन होणार टी-20 टीम इंडियाचा कर्णधार ?

SCROLL FOR NEXT