Amit Shaha News SaamTv
Video

Assembly Election : अमित शहांचं टार्गेट मुंबई; भाजपचं टेन्शन वाढलं?

Amit Shaha News : लोकसभेच्या चुका टाळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुक तयारीत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लक्ष केंद्रित केलं असल्याचं दिसत आहे. शहांनी मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग केले आहे.

Saam Tv

लोकसभेच्या चुका टाळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुक तयारीत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लक्ष केंद्रित केलं असल्याचं दिसत आहे. अमित शहा यांनी विदर्भ, मराठवाड्यातील मतदारसंघांची चाचपणी केल्यानंतर आता त्यांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं बघायला मिळत आहे. त्यासाठी त्यांनी विशेष रणनिती आखली असल्याचं देखील बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मुंबईमध्ये मोठा फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीत या चुका टाळण्यासाठी स्वतः अमित शहांनी मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग केले आहे. मुंबईमधील सर्व मतदारसंघांचा स्वतः अमित शहा आढावा घेणार असून डेंजर झोनमध्ये असलेल्या जागांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. लवकरच अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अमित शहांच्या या दौऱ्याआधी महाराष्ट्र भाजप अलर्ट मोडवर आला असून पुढील तीन दिवसात मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे. हा रिपोर्ट अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांची कामगिरी समाधान कारक नाही त्या आमदारांचे टेंशन चांगलेच वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT