Mumbai Pune Express way Traffic jam saam tv
Video

सलग सुट्ट्यांच्या आनंदात सुस्साट 'सुटले'; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कोंडीत अडकले, VIDEO

Mumbai Pune Express Way Traffic Alert : सलग सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी गावी, पर्यटनस्थळी निघालेल्या नागरिकांची वाहने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक कोंडीत अडकली.

Nandkumar Joshi

अक्षय बडवे, पुणे | साम टीव्ही

विकेंड आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी आलेली सार्वजनिक सुट्टी अशा सलग सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी गावी किंवा पर्यटनस्थळी निघालेल्या नागरिकांची वाहने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक कोंडीत अडकली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, पण त्या योजना अपुऱ्या ठरत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

सलग सुट्ट्या म्हणजे नोकरदार वर्गासाठी पर्वणीच. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा वर्ग गावी, नातेवाईकांच्या घरी किंवा पर्यटनस्थळांवर जातो. आता विकेंड आहेच, त्यात २६ जानेवारीची सुट्टी आली. त्यामुळं ही मोठी सुट्टी साजरी करण्यासाठी नागरिकांची पावलं पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. पण वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्यानं मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पर्यटकांची वाहने या वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करताना कासवगतीनं जात होती. एरवी सुसाट धावणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला होता. दरम्यान, मुंबईसह उपनगरं आणि इतर आजूबाजूच्या शहरांतून लोक पुणे, सातारा, महाबळेश्वर, तसेच अन्य पर्यटनस्थळांवर गर्दी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये भाजप-शिवसेनेची युती; एकनाथ शिंदेंच्या फोननंतर अशोक चव्हाण युतीला तयार

ये गारेगार....हार्बर रेल्वेवर १४ एसी लोकल; पनवेल ते मुंबई प्रवास सुखकर, जाणून घ्या वेळापत्रक

Ratnagiri Tourism : मन उधाण वार्‍याचे...; कोकणाच्या मातीत लपलाय 'हा' किनारा, पाहता क्षणी निसर्गाच्या प्रेमात पडाल

Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

Dog Attack: कुत्र्यांची टोळी अंगावर धावली तर काय कराल? दुचाकी चालकांनी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT