10th And 12th CBSE Exam Saam Tv News
Video

CBSE मध्ये शिवरायांचा २१ पानांचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Chhatrapati Shivaji Maharaj history : सीबीएसईच्या नव्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा २१ पानांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करण्यात आला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

Namdeo Kumbhar

Maratha Empire history added to CBSE syllabus मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, 'आता सीबीएसईनी नवीन पुस्तकांमधे या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा २१ पानांचा इतिहास घेतलेला आहे.' पूर्वी मुघलांचा इतिहास १७ पानांचा तर मराठा साम्राज्याचा केवळ एक परिच्छेद होता, असेही ते म्हणाले. यासोबतच, २०३० पर्यंत महाराष्ट्र देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्यांच्या तत्त्वाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने महाराष्ट्र चालत राहील. छत्रपती शिवरायांचं तत्त्व महाराष्ट्राला मान्य होतेच, पण देशपातळीवर त्याबाबत अनेक संभ्रम होते. सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्यावर, हिंदवी साम्राज्यावर फक्त एक परिच्छेद होता. पण मुघलांचा इतिहास 17 पानांचा होता. पण आता हा इतिहास बदला आहे. आता सीबीएसईने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा 21 पानांचा इतिहास अभ्यासक्रमात केंद्र सरकारने समाविष्ट केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

SCROLL FOR NEXT