Hingoli Flood Saam Tv
Video

Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

Hingoli Kayadhu River Flood: हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. या पूरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पूराचे पाणी शेतात घुसून फळं आणि भाज्यांचे नुकसान झाले आहे.

Priya More

मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, सांडस, सालेगाव, नांदापूर, टाकळगव्हाण सावंगी, कोंढुर , रुपुर चाफणाथ, हरवाडी , माळधावंडा यासह परिसरातील पंचवीस गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याने बाधित झाली आहे. दरम्यान सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग यासह हळद पीक आडवे झाले आहे. सोडेगाव परिसरात तर ७२ तासानंतर देखील शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे.

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना आणि फळबागांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव परिसरात असलेल्या कयाधू नदीकाठच्या शेतीला या पुराच्या पाण्यामुळे बाधा झाली आहे. शेतपीकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. दरम्यान दरवर्षी पुराच्या नुकसानीला वैतागून सोडेगाव येथील शेतकरी दत्तराव काळे यांनी मोसंबी बागेची लागवड केली. मात्र ही मोसंबी तोडणीला आली असताना कयाधू नदीचे पुराचे पाणी त्यांच्या शेतात घुसले आणि हातातून अशी आलेला घास या पुराने हिरावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT