Akshay Shinde Encounter Update SaamTv
Video

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट ? हायकोर्टाने उपस्थित केले प्रश्न

Saam Tv

आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर आक्षेप घेत त्याच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर आता पोलिसांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

याप्रकरणावर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले. 'चार पोलिस असताना आरोपी कसा काय आक्रमक होऊ शकला?', असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. तसंच, 'पिस्तूल चालवायला ताकद लागते. साधा माणूस ते चालवू शकत नाही. याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही. तातडीने अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करा.', असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले. तसंच, आरोपीने तीन बुलेट झाडल्या होत्या. एक पोलिसाला लागली तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत.' असा प्रश्न कोर्टाने केला. यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी सांगितले की, 'पोलिस अधिकाऱ्याला मांडीला ‌जखम झाली आहे.' कोर्टाने सरकारी वकिलांना आणखी एक प्रश्न केला की, ही घटना रहिवासी भागात घडली होती का? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ' मुंब्रा भागात घडली. एका बाजूला रहिवाशी भाग आहे दुसरीकडे‌ टेकडी आहे.' तसंच, आरोपीला बुरखा घालता होता का? यावर सरकारी वकिलांनी नाही असे उत्तर दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: खडकवासला धरणातून २५६८ क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू

Chandrashekhar Bawankule : 'हे लुटारूंचं सरकार'; बावनकुळे यांच्या संस्थेला सरकारने भूखंड दिल्यानंतर विजय वडेट्टीवार कडाडले

Pune News : सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसाची हजेरी

Kalyan Crime : ज्योतिषाकडे हात दाखवू म्हणून नेले अन् खुर्चीला बांधले; माजी नगरसेविकेच्या पतीसोबत घडले भयंकर

Mumbai Rain Update : मुंबईसह पुण्याला पावसानं झोडपलं; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, भर पावसात नागरिकांची धावाधाव, VIDEO

SCROLL FOR NEXT