Mumbai Rain Saam Tv
Video

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Andheri Rain: मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. अंधेरीमध्ये पाणी साचल्यामुळे मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', असा इशारा मनसेने दिला आहे.

Priya More

मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रुज आणि अन्य परिसरात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.

अंधेरी परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्ते जलमय झाले आहेत. के. पश्चिम वॉर्डमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने संताप व्यक्त केला आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांनी पालिकेला इशारा दिला. त्यांनी सांगितले की, 'पालिका आयुक्तांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा साचलेल्या पावसाच्या पाण्यानेच आम्ही आयुक्तांचा जलअभिषेक करू.' स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT