Solapur Shiv jayanti 2025 saam tv
Video

Solapur Shiv jayanti 2025: सोलापुरात पाळणा सोहळा संपन्न, शिवजयंतीचा भव्य सोहळा

Shiv jayanti 2025: सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मध्यरात्री भव्य पाळणा सोहळा झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सोहळा मागील चार वर्षांपासून उत्साहात साजरा केला जात आहे.

Dhanshri Shintre

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री भव्यदिव्य पाळणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या चार वर्षांपासून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

यंदाही तोच उत्साह कायम राहिला. विशेष म्हणजे, सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला, यामुळे सोहळ्याला एक वेगळेच भावनिक आणि स्फूर्तीदायक स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून आलेल्या हजारो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली.

पाळणा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. शिवप्रेमींच्या उत्साहामुळे या सोहळ्याला एक आगळी वेगळी छटा मिळाली, आणि शिवजयंतीचे हे उत्सवी वातावरण पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT