Govindas recreating the iconic ‘Chhava’ scene on the tall human pyramid at Worli’s Parivartan Dahi Handi 2025, cheered by CM Devendra Fadnavis. Saam Tv
Video

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Goosebumps Moment: मुंबईतील वरळी जांबोरी मैदानावर झालेल्या परिवर्तन दहीहंडी 2025 मध्ये गोविंदांनी ‘छावा’ सीन साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. मुख्यमंत्र्यांनीही टाळ्या वाजवून कौतुक केले.

Omkar Sonawane

मुंबईतील सर्वात मोठी आणि लाखोंच्या बक्षिसांची दहीहंडी म्हणजे वरळीच्या जांबोरी मैदानावरील परिवर्तन दहीहंडी 2025 होय. भाजपा मुंबईच्या वतीने आयोजित या दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांसह मोठ्या संख्येने प्रेक्षकांनीही उपस्थिती लावली.

या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहिले आणि त्यांनीच येथे दहीहंडी फोडून उत्सवाचे उद्घाटन केले. त्यानंतर गोविंदा पथकांनी उंचच उंच मानवी मनोरे रचून थरारक सादरीकरण केले आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.

मंत्री आशिष शेलार आणि आयोजक अॅड. संतोष पांडे यांच्या माध्यमातून परिवर्तन इंडिया फाउंडेशनच्या वतीने हा भव्य दहीहंडी उत्सव पार पडला.

यावेळी गोविंदा पथकाने चक्क छावा सिनेमातील प्रसंगच उंच मनोऱ्यावर सादर केला. अंगावर शहारे आणणारा "वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा" सीन, तसेच छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट, संभाजीराजेंचे शौर्य आणि बलिदान हे सारे क्षण मनोऱ्याच्या माध्यमातून जिवंत केले गेले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या दृश्यांनी भारावून गेले. त्यांनी टाळ्या वाजवून गोविंदा पथकाचे कौतुक केले आणि म्हणाले, राणी द्विवेदी आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो. गोविंदांनी ज्या पद्धतीने ‘छावा’ साकारला आहे, त्यातून छत्रपती संभाजीराजेंचं शौर्य जनतेपर्यंत पोहोचलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT