onion news  Saam tv
Video

Onion Export Duty: कांदा उत्पादकांना दिलासा; कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवलं, VIDEO

20% Export Duty Removed: अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे ही मागणी लाऊन धरली होती.यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत होता. विधानसभेत देखील याचे पडसाद उमटले होते. यानंतर केंद्र सरकारने आज निर्यात शुल्क हटवले आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते आणि सरकारकडे निर्यात शुल्क हटवण्याची सातत्याने मागणी केली जात होती. अखेर सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या निर्णयामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT