Jitendra Awhad Saam TV
Video

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

Jitendra Awhad’s Daughter : विधानभवनाच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर खालच्या भाषेत पोस्ट लिहण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानभवनाच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादानंतर आता या वादाची धग सोशल मीडियावर पोहोचली आहे. या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीची, आक्षेपार्ह भाषा वापरत पोस्ट करण्यात आल्या आहेत.

नताशा आव्हाड यांनी त्या पोस्टचा स्क्रीनशॉट स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे .त्यांनी लिहिले, "जसा राजा तशी प्रजा! सगळे गुंडे. माझी यात कोणतीही भूमिका नाही, तरी मला यात ओढले जात आहे." अशी पोस्ट करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, "माझ्या मुलीला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. या प्रकारामुळे सामाजिक माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेक नागरिकांनी नताशा आव्हाड यांना पाठिंबा दर्शवला आहे. आव्हाड पडळकर वादाने केवळ विधानभवनच नव्हे, तर सोशल मीडियावरही खळबळ माजवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism: २० हजारांपेक्षाही कमीत एवढी मस्त ट्रिप? दिवाळी सुट्टीसाठी भारतातील ६ स्वस्त आणि सुंदर ठिकाणं

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची बीडच्या गेवराईतील उमापुरमध्ये सभा

Maharashtra Politics: एकामागोमाग एक, पक्ष नेत्यांचे राजीनामे;मतदारसंघातच आमदार रोहित पवारांविरोधात नाराजीचा सूर?

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

SCROLL FOR NEXT