Gopichand Padalkar News Saam Tv
Video

Dhangar Reservation : गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य !

Gopichand Padalkar : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची आता चर्चा होत आहे.

Saam Tv

धनगर समाजाने शेळ्या - मेंढ्या रखायचं बंद केलं तर जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल, असं वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात सगळीकडे धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आंदोलन करत आहे. मागच्या 15 दिवसापासून लातूरच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौकात धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत हजारे, तसेच अनिल गोयकर या दोन धनगर आंदोलकांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज लातूर-अंबाजोगाई महामार्गावर सकल धनगर समाजाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज आक्रमक झाला आहे. तर गेल्या 4 तासापासून आंदोलकांनी महामार्ग रोखून धरलेला आहे. तात्काळ धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा. अन्यथा सरकारला त्यांची जागा दाखवली असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे. याच आंदोलनाच्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक होत हे वादग्रस्त विधान केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT