central government employee DA hike saam tv
Video

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता वाढणार

dearness allowance increase central employees : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ होणार आहे. महागाई भत्ता ५८ वरून ६० टक्के होण्याची शक्यता आहे. १ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगारासोबत अनेक भत्ते मिळतात. त्यात महागाई भत्ता हा प्रमुख मानला जातो. सरकार दरवर्षी दोन वेळा म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात वाढ करतं. महागाई दरावरून भत्ता किती वाढेल हे निश्चित केलं जातं. डिसेंबर २०२५ च्या ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रिअल वर्कर्सची आकडेवारी जाहीर झाली असून, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिला जाणारा महागाई भत्ता आणि महागाई रिलीफमध्ये प्रत्येकी दोन टक्क्यांची वाढ केली जाऊ शकते.

मागील वेळी सरकारने जून २०२५ च्या एआयसीपीआय-आयडब्ल्यूच्या आकड्यांच्या आधारे डीएमध्ये तीन टक्क्यांची वाढ केली होती. ऑक्टोबर २०२५ पासून महागाई भत्ता लागू झाला होता. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के झाला होता. तर निवृत्तीवेतन धारकांना ५८ टक्के डीआर मिळतो. आता त्यांच्या भत्त्यात प्रत्येकी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Maharashtra News Live Update: थोड्याच वेळात ठाकरेंची पत्रकार परिषद

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

SCROLL FOR NEXT