Gold and silver prices  Saam Tv
Video

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

Gold and silver prices: जळगावच्या सुवर्णबाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे ग्राहाकांना मोठा दिलासा मिळाला. सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती.

Priya More

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसांच्या मोठ्या दरवाढीनंतर आता सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले आहेत. सध्या सोन्याचा भाव जीएसटीसह १ लाख ५८ हजार रुपयांवर पोहोचलाय. तर चांदी २ लाख ५५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. चांदीच्या दरात काहीशी घट झाल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगावमध्ये २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४१,६१० रुपयांवर गेले आहे तर २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,५४,६०० रुपयांवर गेले आहे.

दरम्यान, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २२९० रुपयांनी वाढले. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं २१०० रुपयांनी आणि १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १७२० रुपयांनी वाढले. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाली. तर १ किलो चांदी १५००० रुपयांनी वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT