Milk Price Hike Saam Tv
Video

Milk Price Hike : खिशाला कात्री, अमूलनंतर आता गोकुळचे दूधही महागलं, पाहा नवे दर काय?

Gokul milk price hike : अमूलनंतर गोकुळ दूधाच्या किंमतीतही वाढ झाली असून, ४ मेपासून नवे दर लागू झाले आहेत. फुल क्रीम दूध आता ७४ रुपये, तर ५ लिटर पॅक ३६५ रुपये झाला आहे. दरवाढीचा परिणाम घरगुती बजेटवर होणार आहे.

Namdeo Kumbhar

Gokul Milk Price Hike News : किरकोळ महागाईच्या वाढत्या लाटेत आता गोकुळ दूधाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघाने ४ मेपासून नवे दर लागू केले असून, यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. गोकुळच्या फुल क्रीम (क्लासिक) दूधाची किंमत आता ७४ रुपये प्रतीलिटर, तर ५ लिटर पॅक ३६५ रुपये झाले आहे. गाय दूध (सात्विक) ५८ रुपये प्रतीलिटरवर पोहोचले आहे. मात्र, टोण्ड आणि गोकुळ शक्ती दूधाचे दर जैसे थे राहणार आहेत. अमूलनंतर गोकुळच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण येणार आहे. दूध उत्पादकांना या वाढीचा लाभ मिळेल, पण ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडेल. ही वाढ पॉलिथीन पॅकिंगमधील सर्व दूध प्रकारांसाठी लागू आहे, असे संघाने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT