Sahar Shaikh vs Navneet Rana saam tv
Video

Sahar Shaikh vs Navneet Rana: मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या सहर शेखवर नवनीत राणा कडाडल्या; म्हणाल्या, पाकिस्तानात जा!

sahar shaikh navneet rana controversy : ठाणे महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे, असं म्हणणाऱ्या नगरसेविका सहर शेखला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिरवा करायचा आहे, तर पाकिस्तानात जावं लागेल, असं राणा म्हणाल्या.

Nandkumar Joshi

अमर घटारे, अमरावती | साम टीव्ही

कैसे हराया... भाषणाच्या सुरुवातीचे हेच ते दोन शब्द...व्हिडिओ व्हायरल झाला आणि एमआयएमची नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख चर्चेत आली. सहर शेखचं दुसरं वाक्य म्हणजे पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे....या तिच्या वक्तव्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कैसे हराया....यावरचं म्हणणं तिनं स्पष्ट केलं. ज्यांनी आम्हाला डावललं, त्यांना दिलेलं हे उत्तर होतं. समोरच्या व्यक्तींना त्यांनी केलेली चूक समजायला हवी, यासाठी तिनं भाषणाची सुरुवातच तशी केली होती. या भाषणातून तिनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाच डिवचलं होतं.

नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भाषणाच्या सुरुवातीलाच कैसे हराया म्हणून आव्हाडांना डिवचणाऱ्या सहर शेख हिनं पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे, असं म्हटलं आणि एकच वाद पेटला. या वक्तव्यानंतर काही जणांनी आक्षेप घेतला. मुंब्रा पोलिसांत निवेदन दिलं. त्यामुळं मुंब्रा पोलिसांनी तिला नोटीस बजावली. तसंच तिला समज दिली. या वक्तव्यावरही सहरनं स्पष्टीकरण दिलं होतं. एमआयएम पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा असल्यानं तसं म्हणाले. जर तो भगवा रंग असता तर मी तसं म्हणाले असते, असे तिनं सांगितलं.

सहर शेखनं स्पष्टीकरण दिल्यानंतरही हा वाद थांबलेला दिसत नाही. माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सहर शेखला थेट नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रंग हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानाच जावं लागेल. या देशात फक्त भगवा आणि निळा रंग चालेल. कुणी कितीही म्हटलं की हिरवा रंग करू, पण त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं राणा म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं रक्त आमच्यात आहे. ते रक्त घेऊन आम्ही काम करतो. या देशातून भगवा रंग कुणीच हटवू शकत नाही, असंही राणांनी ठणकावून सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

SCROLL FOR NEXT