Marathi Language Crisis saam tv
Video

Marathi Language Crisis : मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतला का? महाराष्ट्रातचं मराठी माणसावर अरेरावी

Marathi language: मराठी बोलायला महाराष्ट्र खरेदी केला का? असा अपमानजनक प्रश्न विचारत, परप्रांतीय तरुणीने मराठी तरुणाशी उद्धटपणे वागले.

Dhanshri Shintre

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका तरुणीने मराठी बोलण्यावर टीका केली. मी मराठीत का बोलू? मराठी बोलायला जबरदस्ती आहे का? असे म्हणत तिने मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान केला. मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही काही परप्रांतिय मुंबईत मराठीच्या द्वेषाच्या भावना व्यक्त करत आहेत. मुंबईच्या चारकोपमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती तरुणी मराठी आणि महाराष्ट्राशी संबंधित अपमानजनक भाषण करत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

चारकोपमधील एका मोबाईल कंपनीच्या गॅलरीत मराठी तरुणाने तक्रार नोंदवण्यासाठी प्रवेश केला. त्यावेळी काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणीने त्याच्याशी उद्धटपणे वागत मराठीत बोलण्यास नकार दिला. मी मराठी बोलणार नाही, तुम्ही सांगणार म्हणून मराठी बोलायचं का? असे ती म्हणत होती. तिच्या अर्वाच्च आणि उद्धट उत्तरांमुळे नाराजी व्यक्त झाली.

तरुणीने मराठी बोलायला महाराष्ट्र खरेदी केला का? असा अपमानजनक सवाल करून मराठी तरुणाला उद्धटपणे वागवले. यावर त्या मराठी तरुणाचा पारा चढला आणि त्याने तिला मराठीत बोलण्यास सांगितले. त्याला गॅलरीत असलेल्या दुसऱ्या तरुणाची साथ मिळाली. तरुणीने पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली, पण त्यावर मराठी तरुणाने तिला पोलिसांना बोलवण्याचं आव्हान दिलं. यानंतर गॅलरीतील एक पुरूष कर्मचारी आला आणि त्याने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT