Gas Tanker Spot In Pune Chakan Saam TV
Video

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Pune News Today | चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Saam TV News

चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा गोरखधंदा एका ढाब्याच्या (छोटं हॉटेल) समोर सुरू होता. एका कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं. अशात गॅसचा स्फोट झाला, तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना ही मोठी आग लागली. तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे ही नुकसान झाले आहे. शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. चाकण पोलीस घटनेचा तपास करतायेत. गेल्या वर्षी अशीच धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये ही घडली होती. तेंव्हा ही गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT