Mumbai Pune Expressway traffic updates Saam
Video

Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा गॅस टँकरचा अपघात, ब्रेक फेल झालं अन्...

Mumbai Pune Expressway traffic updates : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रोपेलिन गॅस टँकरचे ब्रेक फेल होऊन तो सुरक्षा भिंतीला धडकला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करून वाहतूक सुरळीत केली.

Namdeo Kumbhar

ब्रेक फेल झाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानं टँकरची डोंगराला धडक झाली. पोलीस आणि प्रशासनाच्या तत्परतेनं वाहतूक कोंडी टळली आहे. पण गॅस टँकरच्या अपघातानं प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रोपेलिन गॅस घेऊन जाणाऱ्या एका टँकरचे ब्रेक फेल झाले. यामुळे हा टँकर महामार्गावरील सुरक्षा भिंतीला जाऊन धडकला, मात्र प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबवली आणि अवघ्या अर्ध्या तासात अपघातग्रस्त टँकर बाजूला हटवला. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सध्या महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT