Gaja Marne Saam Tv
Video

Gaja Marne: गजा मारणेची मटण पार्टी भोवली, अधिकाऱ्यासह ४ पोलिस निलंबित| VIDEO

Gaja Marne’s VIP Treatment Exposed: गँगस्टर गजा मारणेची मटण पार्टी पोलिसांना चांगलीच भोवली आहे. गजा मारणेला पोलिस सांगलीला घेऊन जात होते त्यावेळी तो धाब्यावर थांबला होता. याप्रकरणी ४ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

Priya More

कुख्यात गँगस्टर गजा मारणेची मटण पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली आहे. एका अधिकाऱ्यासह ५ पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले आहे. मकोकाअंतर्गत गजा मारणे पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिस सांगली कारागृहात घेऊन जात होते. त्यावेळी गजा मारणेनं पोलिसांसमोरच महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केली. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणुकीमुळे पोलिसांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्याचे गुन्हे शाखा पोलिस आयुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, 'रेकॉर्डवरील गुन्हेगार गजानन मारणे याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिस त्याला सांगलीच्या दिशेने घेऊन जात होते. त्यावेळी साताऱ्यातील कणसे ढाबा येथे गजानन मारणे थांबला होता. यावेळी त्याला भेटण्यासाठी काही तरुण आले होते. यातील ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गार्ड म्हणून नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण ५ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कायद्याच्या मार्गावर न जाता ढवळाढवळ करेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. १ पोलिस अधिकारी आणि ४ अंमलदार यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात आले आहे. कर्तव्याचे काम त्यांना दिले जाणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT