Nashik Saam TV
Video

Nashik : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार | VIDEO

Gangapur Dam Update : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं गंगापूर धरण ७६ टक्के भरलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, धरण ७६ टक्के भरले आहे. परिणामी, आज सकाळी ११ वाजेपासून गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.यापूर्वी धरणातून ६०३ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते, मात्र आता हा वेग १२३५ क्यूसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासह गोदावरी काठच्या भागांमध्ये नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास, पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.सध्या जिल्ह्यातील एकूण १४ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तयार ठेवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT