Eknath Shinde Saam Tv
Video

Eknath Shinde : ...तर शिंदेंना एकही पालिका जिंकून देणार नाही, नाईकांचं उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज

Eknath Shinde Ganesh Naik political conflict details : ठाणे आणि नवी मुंबईतील राजकारण तापले असून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर थेट इशारा दिल्याने वाद आणखी चिघळला आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra local body politics Shinde vs Naik : एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील ठाणे-नवी मुंबईतील वाद आणखी चिघळलाय. मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा थेट इशारा दिला आहे. माझ्या नादाला लागाल तर अस्तित्व संपवेन, असा थेट इशारा नाईकांनी शिंदे पिता-पुत्रांना दिला आहे. नाईकांच्या या विधानामुळे महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. ठाणे आणि कल्याणमधील जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माझ्या नादाला लागले तर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची एकही महापालिका येऊ देणार नाही, श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करेन. कल्याण-ठाण्यातील जनता शिंदेंना संपवेल, असे गणेश नाईक म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. गणेश नाईक यांनी शिंदे पिता-पुत्रांना थेट आव्हान देत ठाणे जिल्ह्यातून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा इशारा दिला आहे. "माझ्या नादाला लागाल, तर ठाणे जिल्ह्यातून तुमचं अस्तित्व संपवून टाकेन," अशा कठोर शब्दांत नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT