11th Admission Saam TV
Video

FYJC Admissions 2025 : 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, कॉलेज कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर | VIDEO

FYJC Classes to Start from August 11 : अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीनं राबविली जातेय. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलैअखेर वाट पाहावी लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया प्रथमच पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रक्रियेस अधिक वेळ लागणार असून, जुलै अखेरपर्यंत प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे अकरावीचे वर्ग यंदा ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. दरवर्षी जुलैच्या सुरुवातीलाच महाविद्यालये सुरू होत असतानाही यंदा ऑनलाइन प्रक्रियेतील विलंबामुळे एक महिना उशीर झाला आहे.

अकरावीचे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने अध्यापनाच्या तासिका वाढवण्याचा आणि सुट्ट्यांचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना मे अखेरपासूनच महाविद्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.याशिवाय, आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

Ovache Pani Pinyache Fayde: 15 दिवस रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्या, वजन होईल झटपट कमी

SCROLL FOR NEXT