Central Railway Delays  Saam Tv
Video

Nashik News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नाशिकमध्ये मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; पाहा VIDEO

Central Railway Delays: नाशिमध्ये मालगाडीचे डबे रुळावरून घसरले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नांदगाव रेल्वे स्थानक यार्डानजीक सकाळी ७ वाजता ही घटना घडली.

Priya More

नाशिकमध्ये मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्य अप मार्गावर मालगाडीचे डबे रुळावरून घसरले. नांदगाव रेल्वे स्थानक यार्डानजीक सकाळी ७ वाजता ही घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी झाली आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस, धुळे- दादर मेमू गाड्या खोळंबल्या आहेत. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले असून डबे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मनमाडवरून दुरुस्ती वाहन आणि तांत्रिक पथक आले आहे.

डाऊन लाइनवरून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे. मालगाडीतून सिमेंटची वाहतूक सुरू होती. ही मालगाडी दौंडच्या दिशेने जात होती. मालगाडीचा घसरलेला डबा उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनमाडवरून रेल्वेचे हायड्रोलिक इन्स्ट्रुमेंट आणि अपघात विभागाचे पथक घटनास्थळावर दाखल झाले आहे. रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्ग थोड्यावेळासाठी बंद ठेवण्यात आलेत. घसरलेले डबे उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १०० हून अधिक अधिकारी कर्मचारी यांचे घटनास्थळी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025: राख्यांचे खरे केंद्र कोणते? कालना, जयपूर की कोलकाता जाणून घ्या रंजक माहिती

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये बोगस खत विक्रीचा गोरख धंद्याचा पर्दाफाश

Akola : ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; गावकऱ्यांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा

Raksha Bandhan Gift: या राखीपौर्णिमेला लाडक्या बहिणीला द्या ही खास भेटवस्तू, आजचं करा खरेदी

Shocking News : आईशी सतत भांडतो, संतापलेल्या तरुणाने धाकट्या भावाला संपवलं; भंडाऱ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT