Rupali Chakankar Saam tv
Video

रुपाली चाकणकर यांना ईडीकडून समन्स? राजकीय वर्तुळात खळबळ, VIDEO

rupali chakankar news : रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता त्यांना ईडीने समन्स दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही ईडीचे समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी एसआयटीकडून साडेपाच तास चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर आता ईडीची एन्ट्री झाली आहे. यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पदाचा गैरवापर करून काही आर्थिक व्यवहार झाले का? याचा तपास करण्यात येणार आहे. शिवनिका संस्थेतील सहभागाचीही चौकशी होणार आहे. आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाईल.

रुपाली चाकणकर यांची चौकशी अहवाल ईडीला पुढील काही दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे. चाकणकरांच्या ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अशोक खरातने खंडणी रॅकेट चालवून ‘बेनामी’ बँक खात्यांच्या नेटवर्कमधून ७० कोटींपेक्षा अधिक रक्कम वळवल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या मोबाईलवर SMS आला का?

SCROLL FOR NEXT