former sarpanch attacked by group in dhule over encroachment complaint saam tv
Video

धक्कादायक! माजी सरपंचावर २५-३० जणांचा जीवघेणा हल्ला, CCTV मध्ये घटना कैद

Dhule Ex Sarpanch Attacked : दुहेरी हत्याकांडानं धुळे जिल्हा हादरला असतानाच, माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. २५ ते ३० जणांच्या टोळक्यानं माजी सरपंचावर हल्ला केला.

भूषण अहिरे

बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं अख्खा महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर आता धुळे जिल्ह्यात माजी सरपंचावर २५ ते ३० जणांच्या टोळक्यानं हल्ला केल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडलीय. शिंदखेडा तालुक्यातील बाभळे गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला.

माजी सरपंचांवरील हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्यासारखीच माझीही हत्या करण्याचा डाव असल्याचा आरोप ज्ञानेश्वर पाटील यांनी केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारची नवी योजना; तिसऱ्या मुलासाठी ३० हजार अन् चौथ्या अपत्यासाठी देणार ४० हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra News Live Update: महावितरणाच्या बैठकीत अंबादास दानवे आक्रमक

Budhaditya Rajyog: शनी जयंतीच्या दिवशी बनला बुधादित्य राजयोग; आजपासून या ४ राशींचं नशीब चमकणार

कोलेस्ट्रॉल कधीच वाढणार नाही! करा 'हे' 5 सोपे घरगुती उपाय

Fort In Palghar : पालघरमधील ऐतिहासिक आकर्षण, सागरी सुरक्षेचा रक्षक म्हणून ओळखला जायचा 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT