A stray dog trapped inside a leopard cage installed by the Forest Department in Koregaon Bhima. Saam Tv
Video

बिबट्यासाठी ठेवला पिंजरा अन् अडकला भलताच प्राणी, पाहा VIDEO

Dog Trapped In Leopard Cage: कोरेगाव भीमा परिसरात बिबट्यांच्या हालचालींमुळे भीतीचं वातावरण असतानाच वन विभागाच्या बिबट्यांसाठी लावलेल्या पिंजऱ्यात कुत्रं अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

कोरेगाव भीमा परिसरात शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तणावाचं सावट असतानाच आता बिबट्याच्या हालचालींनी आणखी चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेले पिंजरे मात्र फोल ठरताना दिसतायत. कारण बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात वन विभागाच्या नजरेसमोर चक्क एक कुत्रं जेरबंद झालं! त्यामुळे वन विभागाच्या दक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कोरेगाव भीमा परिसरात बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आलेत. मात्र या पिंजऱ्यात बिबट्या नव्हे तर कुत्रं अडकल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे वन विभागाची तयारी आणि देखरेख यावर स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बिबट्याच्या ऐवजी कुत्रं पकडलं जाणं ही वन विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठी शंका निर्माण करणारी बाब ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीडितांना घरे द्याच, अन्यथा भाडे द्या; शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर भाजप नेत्याचा संताप

राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत, शिंदेंसोबत युती, 'लवचिक' झाली नाती

ZP निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव ? नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश?

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

SCROLL FOR NEXT