Scene outside Sushil Kedia’s Worli office after MNS workers allegedly vandalized the premises Saam Tv
Video

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Five MNS Activists Arrested: मराठीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी सुशील केडिया यांच्या वरळीतील कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांना अटक झाली असून, पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

Omkar Sonawane

महाराष्ट्रात राहूनही मराठी शिकणार नाही म्हणणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांच्या वरळीतील ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी पहिलीच मोठी कारवाई केली आहे. तोडफोड करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर वरळी पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रात ३० वर्षांपासून राहतोय. पण मी मराठी बोलणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज, शनिवारी सकाळी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या वरळीतील ऑफिसची तोडफोड केली. या तोडफोडीच्या घटनेनंतर वरळी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

वरळी पोलिसांनी मनसेच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 223,189 (2) 189(3), 190, 191(2), 191(3), 125, 324(4) 324(5), 37(1) c आणि 135 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. तसेच पाच कार्यकर्त्यांना वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT