नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च २०२५ मध्ये कार्यान्वित होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, एक नवी अपडेट आली आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून ही चाचणी घेण्यात आली. या धावपट्टीवरून विमानानं उड्डाण घेतल्याचं बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं.
अलीकडेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला होता. कामात किती प्रगती झाली, किती दिवसात काम पूर्ण होऊ शकतं याबाबतची माहिती घेतली. दरम्यान या विमानतळाचे वेगाने काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, मार्च 2025 मध्ये ते कार्यान्वित होऊ शकतं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.