नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय हवाईदलाचे ‘सी 295’ विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट, मुरलीधर मोहोळ आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली. ‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरले. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आलं.
यशस्वी लॅंडींग हा या पूर्ण बांधणीतला महत्वाचा टप्पा होता. 5 टप्प्यात नवी मुंबई विमानतळ उभारलं जाणार आहे. यातला पहिला आणि दूसरा टप्पा एकत्रित पूर्ण करण्यात येणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रनवे असेल. 31 मार्च 2025 पर्यंत हे विमानतळ वाहतुकीसाठी खुलं होणार आहे. अंदाजे 2 कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करणार आहेत. 3, 4 आणि 5 या टप्प्यात 3 टर्मिनल आणि 1 रनवेचं काम पूर्ण होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.