Father and son locked in a high-stakes political battle during the Mumbai civic elections. Saam Tv
Video

निवडणुकीच्या आखाड्यात बाप-लेक एकमेकांच्या विरोधात; शिंदेसेना-ठाकरेसेनेत काँटे की टक्कर|VIDEO

Father Vs Son Political Battle In Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 138 मध्ये अनोखी लढत पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेकडून मुलगा आणि ठाकरे गटाकडून वडील आमनेसामने उभे ठाकल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Omkar Sonawane

29 महापालिकेच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात रणसंग्राम पाहायला मिळत आहे. सगळ्याच पक्षांनी आपली कंबर कसायला सुरुवात केली आहे. एकाच नावाचे दोन दोन पक्ष अशी निवडणूक सध्या पहिल्यांदाच होत असून निरनिराळ्या युत्या आघाड्या निर्माण होताना दिसत आहे. अशातच राज्यात चाललेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा भडका थेट घरातच उडालाय. मुंबईच्या वॉर्ड नंबर 138 मध्ये चक्क बाप–लेक आमनेसामने उभे ठाकलेत. मुलगा डॉ. अमोल अंबेकरांना शिंदेसेनेकडून तिकीट मिळालंय, तर बाप महादेव अंबेकरांना ठाकरेंनी उमेदवारी दिलीय. ही लढत म्हणजे कोल्हापुरी मिसळसारखी तिखट झालीय. गल्लीत, चहाच्या टपरीवर, घराघरात ह्याच चर्चेला उधाण आलंय. “कोण जिंकणार?” यावर पैजा लागल्यात. या अनोख्या लढतीमुळं वॉर्डातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि निवडणूक रंगतदार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर, भटक्या कुत्र्यांवर शिक्षक ठेवणार ‘पाळत’?

Khandala Accident: खंडाळ्यातल्या खंबाटकी घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोची तीन वाहनांना धडक

भाजपसोबत दुरावा, पवारांशी घरोबा? पुण्यात शिंदेसेनेसोबत दोन्ही राष्ट्रवादीची युती?

ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरवली; राजकारणात दिला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

Maharashtra Live News Update: ठाणे महानगरपालिका निवडणूक: वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

SCROLL FOR NEXT