Ravikant Tupkar controversial statement Saam Tv
Video

Nagpur: '...तर दोन-चार मंत्र्यांना कापा', रविकांत तुपकरांचं खळबळजनक विधान

Ravikant Tupkar controversial statement: रविकांत तुपकर यांनी नागपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भाषण करताना वादग्रस्त विधान केले. दोन-चार मंत्र्यांना कापा असे ते म्हणाले. तसंच, महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही पळवून लावू, असा इशारा त्यांनी दिला.

Priya More

नागपुरात झालेल्या शेतकरी आंदोलनात नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत सरकारला थेट इशारा दिला. यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, 'जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदारला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा'. संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही.', असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील, पण आमच्या छात्या कमी पडणार नाहीत, असे म्हणत त्यांनी आंदोलनाची तीव्रता दाखवून दिली. नेपाळमधील मंत्र्यांवरील हल्ल्याचा दाखला देत, महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही पळवून लावू, असा इशाराही त्यांनी दिला. आत्महत्या करण्याऐवजी सरकारसोबत संघर्ष करण्याचा मार्ग त्यांनी शेतकऱ्यांना दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT