पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुंड गजा मारणेच्या पत्नीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरला.  SAAM TV
Video

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीनं भरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज, VIDEO

Gangster Enter in Pune Election : पुणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात कुख्यात गुंड गजा मारणे आणि आंदेकर कुटुंबातील सदस्य उतरणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गजा मारणेची पत्नी, तर आंदेकर कुटुंबातील दोन महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Akshay Badve

कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे पुणे महापालिका निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जयश्री यांना ए बी फॉर्म देण्यात आला. जयश्री मारणे पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी या प्रभागातून निवडणूक लढणार आहे. जयश्री यापूर्वी मनसेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. २०१२ मध्ये मनसेत असलेल्या जयश्री मारणे यांनी नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला; पण २०१७ मध्ये निवडणुकीत त्यांनी न लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्या अजित पवार गटाकडून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

गुंड गजा मारणे नेमका कोण?

पुण्यात मारणे टोळीचा प्रमुख असलेला गजा मारणे म्हणजेच गजानन पंढरीनाथ मारणे. पुण्यातील कोथरूड भागात महाराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गजा मारणेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांत खंडणी, मारहाण, हत्या, हत्येचे प्रयत्न असे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे गजा मारणेवर आहेत.

आंदेकरच्या घरात दोघींना उमेदवारी

दुसरीकडं, आंदेकर कुटुंबीयांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधत पुण्यात उमेदवारी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी देण्यात आली. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना आज अजित पवारांच्या पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आला. आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत दोन्ही अर्ज भरण्यात आले. पुण्यातील प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ, नाना पेठ या प्रभागासाठी दोघींनी आज उमेदवारी अर्ज भरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दौंडला भिमा नदीला आलेल्या पुरामुळे वीटभट्टांना पुराच्या पाण्याचा तडाखा

Vada Pav Recipe : पावसाची मजा दुप्पट होईल, घरीच बनवा मुंबई स्पेशल चटपटीत वडापाव

सासऱ्याचं घाणेरडं कृत्य! सुनेला जबरदस्ती दारू पाजली अन् नको के केलं; रेल्वे इंजिनिअरच्या काळ्या कृत्याने खळबळ

Kapoor Sisters: अंशुला कपूरच्या लग्नात 'कपूर सिस्टर्स'चा जलवा; जान्हवी, खुशी आणि सोनमचा ग्लॅमरस लूक व्हायरल

मुंबई-नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू, कुठे-कुठे असणार थांबा?

SCROLL FOR NEXT