Kondhawa Saam tv
Video

Kondhwa : कथित कोंढवा बलात्कार प्रकरण, तरूणीवर गुन्हा दाखल | VIDEO

Fake Complaint : खोटी तक्रार दिल्याप्रकऱणी तरुणीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी हे दोघे मित्र असल्याच पोलिस तपासात उघड झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोंढवा परिसरात २ जुलै रोजी एका तरुणीने घरात घुसून डिलिव्हरी बॉयने बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच अनेक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.

मात्र, तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. तक्रारदार तरुणीने ज्या व्यक्तीवर आरोप केला होता, तो प्रत्यक्षात डिलिव्हरी बॉय नसून तिचा ओळखीचा मित्र असल्याचे उघड झाले आहे. दोघांनी परस्पर संमतीने एकत्र फोटो काढले होते, हे देखील तपासात निष्पन्न झालं आहे.

या प्रकरणात खोट्या तक्रारीने पोलिसांचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता या तरुणीने अशा प्रकारची खोटी तक्रार का केली? तिचा उद्देश काय होता? याचा शोध घेतला जात आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या खोट्या तक्रारीमुळे पोलिस यंत्रणा आणि प्रशासनाचा वेळ वाया जाऊ नये, म्हणून हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi High Court : लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Afternoon Sleeping Time: दुपारी कधीपण झोपू नका, 'ही' आहे योग्य वेळ

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुंबईसाठी मास्टर प्लान, फक्त रस्तेच नाही तर मायानगरीचा केला कायापालट

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT